Pune: पार्थ एनक्लेव्ह सोसायटीच्या ‘ई’ विंगमध्ये सौर पॅनलद्वारे वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन 

एमपीसी न्यूज – कर्वेनगर येथील पार्थ एनक्लेव्ह( Pune)सोसायटीच्या ‘ई’ विंगमध्ये सौर पॅनलद्वारे वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि लॉ कॉलेजचे प्राचार्य  संजय जैन यांच्या हस्ते करण्यात आले. 
अनेक विकसनशील देशांप्रमाणे आपल्या देशातही (Pune)पारंपरिक पध्दतीने औष्णिक विद्युत निर्मिती करण्यात येत असून यामुळे होणारे कार्बन उत्सर्जन आणि जागतिक तापमान वृद्धी हे विषय चिंतनीय आहेत. आपल्या देशात तब्बल ५३% विद्युत निर्मिती कोळशाचे ज्वलन करून होत असल्याने वाढणारे हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अपारंपरिक उर्जास्रोतांचा वापर अनिवार्य आहे.
अशा वेळी कर्वेनगरमधील नागरिक असा पर्यावरणपूरक उपक्रम आपल्या सोसायटीमध्ये राबवत समाजापुढे आदर्श निर्माण करत असल्याचे पाहून अभिमान वाटतो.

या सोसायटीमध्ये पूर्वी कॉमन वीजबिल तब्बल तीस ते पस्तीस हजार रुपये इतके येत असून त्यासाठी १२ किलोवॅट विजेची आवश्यकता भासत होती. हा प्रकल्प १५ किलोवॅट शक्तीचा असून यामुळे तब्बल आठ ते साडेआठ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा खर्च अवघ्या तीन वर्षात सोसायटीस वसूल होणार आहे, अशी माहिती स्वप्नील दुधाने यांनी दिली.
ग्रीन एनर्जी या कंपनीने या प्रकल्पास तब्बल पंचवीस वर्षे गॅरंटी दिली असून येणारी अनेक वर्षे या प्रकल्पामुळे या  सोसायटीला पूर्णपणे मोफत वीज पुरवठा होईल, यात शंकाच नाही.
ही आर्थिक आकडेवारी दिलासादायक आहेच, परंतु आपण या निसर्गाचा एक अविभाज्य भाग असून निसर्गाचा पुरेपूर वापर करताना त्याच्याप्रती आपल्या जबाबदारीही स्वीकारल्या पाहिजेत, असा संदेश या प्रकल्पातून दिला गेला, याचा आनंद वाटतो. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत नागरिकांना या  प्रकल्पाचे पटवून दिलेले महत्व वाखाणण्याजोगे असून समाजातील विविध सोसायट्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही दुधाने यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.