Pune: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल भोसरी, पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील ब्रायडल मेकअप स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – मास्टर माईंड ग्लोबल स्कूल येथे (Pune)पलक मेक ओव्हर स्टुडीओ द्वारे रविवारी (दि.4) ग्लोबल आर्टिस्ट आणि मेकओव्हर अकॅडमी असोसिएशन मंजूर राष्ट्रीय स्तरावरील ब्रायडल मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  मुली आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर मॅडम, (Pune)मीनाक्षी सोनार , दीपा जाधव,  उषा वाणी, सुभा सुरेश, नैना लोहार यांना आमंत्रित करण्यात आले होते . यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. तसेच मोफत नेल एक्सटेंशन सेमिनारचे ही आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धा पार पडली.

Pune : पीच परफेक्ट’मधून आठ स्वयंसेवी संस्थांसाठी ‘एसव्हीपी’ने उभारला सव्वा दोन कोटींचा निधी

मास्टर माईंड शाळेच्या प्राचार्या विद्यार्थ्यांबरोबरच महिलांच्या समृद्धी व विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात .त्यासाठी त्यांनी शाळेत  ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेसचे ही आयोजन केले होते.

तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळेतील महिला पालकांच्या नवीन कौशल्य विकासासाठी विविध कार्यशाळांचे सोमवार (दि.5) ते  12 या तारखांना दुपारी 2 ते 3 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये भरत काम,  मेहंदी कला ,संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा , केक बेकिंग , ज्वेलरी क्राफ्टिंग सत्र, क्रिएटिव्ह बॉटल आर्ट,  हेअर स्टाइल क्लास इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे नक्कीच महिलांच्या नवीन कौशल्यांचा विकास होईल तसेच त्यांना स्वयंरोजगार मिळून त्या घरबसल्या कमवू शकतील. तसेच महिलांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.