Akurdi : सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – काेकणातील एक जण म्हणताे (Akurdi) आमचा बाॅस सागर बंगल्यावर तर काेण म्हणतय वर्षा बंगल्यावर आमचा बाॅस बसला आहे. त्यामुळे हे गाेळ्या मारतात, लाेकांचा जीव घेतात. गुंडांच्या गळ्यात गळे घालतात. राज्यात सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आकुर्डी येथे झालेल्या जनता दरबारात पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, मावळ संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड मावळ संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिताताई तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे तसेच धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव आदी उपस्थित होते.

Pune : पीच परफेक्ट’मधून आठ स्वयंसेवी संस्थांसाठी ‘एसव्हीपी’ने उभारला सव्वा दोन कोटींचा निधी

दानवे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कायदा (Akurdi) सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. आताचे राज्य काद्यद्याचे आहे की नाही, याचा सर्वांनी विचार करावा. साधन सुचितेचा दावा करणा-या भाजपचा आमदार पाेलीस ठाण्यात सहकारी पक्षाच्या लाेकांवर गाेळीबार करतात. हा गाेळीबार गुंडा गर्दीचा प्रकार आहे. मारणारा आणि ज्याच्यावर गाेळी मारली दाेघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. जमीनी, संपत्तीच्या वादातून हे प्रकार हाेत आहेत. मुख्यमंत्र्यांचा खासदार मुलगा वर्षा बंगल्यावर पुण्यातील नामाकिंत गुंडाला वाढदिवसानिमित्त भेटतो. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आले आहे.

चिंचवड, कसबा पाेटनिवडणुकीवेळी सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लाेकांना शासनातील लाेकांनी बाेलविले हाेते. निवडणूक काळात किती गुंड पॅराेलवर सुटल्याचे आम्हाला माहिती आहे. राजकारणासाठी गुंडाचा वापर केला जात आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी गुंड सक्रीय केले जात असल्याचे आरोप दानवे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.