Life Certificate : हयातीचा दाखला सादर करण्याचे निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

एमपीसी न्यूज : निवृत्तीवेतन धारकांना (Life Certificate) बँकेमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर बँक व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करता येईल. राज्य शासनाच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकित केलेला हयातीचा दाखला कोषागारास सादर करावा.

हयातीचा दाखला https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन सादर करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची कार्यपद्धती https://youtube/nNMIkTYqTF8 लिंकवर उपलब्ध आहे. यादृष्टीने बायोमेट्रिक ठसे हस्तगत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानी मान्यता दिलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसची माहिती https://uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून डिजीटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करुन दिली आहे. सदर सेवा वापराची विनंती टपाल विभागाकडे स्वतःच्या भ्रमणध्वनीद्वारे करण्यासाठी ‘पोस्टइन्फो ॲप’ गुगल प्लेस्टोअर ॲप वरुन डाउनलोड करावे. ज्यांना भ्रमणध्वनी वापरता येत नाही त्यांनी नजीकच्या टपाल कार्यालयास भेट द्यावी.

BJP yuva morcha : ‘धन्यवाद मोदीजी’…भाजपा युवा मोर्चाकडून 2 हजार आभार पत्रे

या सुविधा लाभ घेण्याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी टपाल विभागास (Life Certificate) कळविण्यानंतर टपालवाहक आवश्यक साहित्यासह त्यांच्या निवासस्थानी येऊन बोटांचे ठसे घेणार आहे. सुविधा सशुल्क असल्याची नोंद घ्यावी. टपालवाहकामार्फत ऑनलाईन डिजीटल हयातीचा दाखला सादर करण्याची सविस्तर माहिती http://youtube/cERwMU7g54 या लिंकवर उपलब्ध आहे.

विदेशात वास्तव्य करणारे निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी भारतीय दूतावास, भारतीय उच्च आयुक्तालय येथील प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत हयातीचा दाखला सादर करता येईल अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.