BJP : दिवंगत अंकुशरावांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा वटवृक्ष !

एमपीसी न्यूज – प्रतिकूल राजकीय परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष वाढवण्यात आणि रुजवण्यात दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे मोठे योगदान आहे.(BJP) सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार देणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसमावेशक राजकारणाची भूमिका ठेवून भाजपाचे 16 नगरसेवक बलाढ्य विरोधकांसमोर निवडून आणण्याची किमया त्यांनी केली होती, अशा आठवणींना उजाळा देण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत दिवंगत अंकुशराव लांडगे यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, मोरेश्वर शेडगे, माजी महापौर राहुल जाधव, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, सागर हिंगणे, (BJP) माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, शिवदास हांडे, विनायक आबा मोरे, गणेश ढाकणे, दत्ता यादव, विकास मिश्रा, अजित कुलथे, बाळासाहेब भुंबे, कोमल शिंदे, कविता हिंगे, सौ मकवाना आणि इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

BJP yuva morcha : ‘धन्यवाद मोदीजी’…भाजपा युवा मोर्चाकडून 2 हजार आभार पत्रे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे योगदान आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या जीवनातील संघर्ष निश्चितच प्रेरणादायी आहे. (BJP) त्याच्या विचारांचा वारसा आम्हा नव्या पिढीला चालवण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.