PCMC : हयातीचा दाखला घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज- दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “हयातीचा दाखला” घरोघरी (PCMC)जाऊन सर्वेक्षण करण्यास 26 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

 

या योजना अंतर्गत 26 डिसेंबर 2023 पासून 60 दिवसापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा “हयातीचा दाखल्या” बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची मुदत 26 फेब्रुवारी 2024  रोजी संपलेली होती. 27 फेब्रुवारीपासून 26 मार्च 2024 पर्यंत सदर सर्वेक्षणाला मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अश्या लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज महापालिका, मुख्य कार्यालयात सादर करावा. याबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देणेत आलेली होती. प्रत्यक्ष सर्वेक्षणचे कामकाज चालू असताना असे निर्देशनास आले आहे की, अद्याप पर्यंत जवळपास दीड हजार लाभार्थ्यांचे राहण्याचे पत्ते अपूर्ण असून मोबाईल नंबर बंद, चूकीचे नंबर आहेत असा सदर संस्थेने अहवाल दिलेला आहे.

Pune AFMC : पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला युनिट प्रशस्तीपत्र प्रदान

 

ज्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला आहे.  आजअखेर ज्यांच्याशी संपर्क झालेला नाही. पण दिव्यांग योजनेचा लाभ घेतात अशा सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग, मुख्य कार्यालयात सादर करावा. अन्यथा अशा लाभार्थ्यांचा लाभ स्थगित केला जाईल याची दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. लाभार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त  श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.