Talegaon : तळेगाव नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ( Talegaon) सादर करण्यात आले.  प्रशासन अधिकारी सुरेंद्र नवले आणि मुख्याधिकारी एन के पाटील यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, नगरपरिषद नवीन इमारत बांधणी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

324 कोटी 78 लाख 77 हजार 111 रुपये जमेचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये 342 कोटी 76 लाख 16 हजार रुपये खर्च दर्शवला आहे. यावर्षी मालमत्ता कर वगळता इतर सुविधांच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

घरपट्टी, पाणीपट्टी, शासकीय अनुदान, अंशदान व शासकीय अर्थसहाय्य, नगरपरिषदेच्या स्थावर ( Talegaon) मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी, परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी, ठेवींवरील व्याज यामधून नगरपरिषदेला 296 कोटी 2 लाख 77 हजार 500 रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. आगामी आर्थिक वर्षांत सर्व खर्च जाता 2 लाख 61 हजार 111 रुपये शिल्लक राहतील, असे सांगण्यात आले आहे.

PCMC : हयातीचा दाखला घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ

नळ जोडणी, जाहिरात, जागा भाडे, नक्कल शुल्क, सर्वेअर, आर्किटेक, इंजिनिअर परवाना शुल्क, सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य प्रतिदिन आकार, णा हरकत दाखले शुल्क, णा हरकत दाखला व्यावसायिक प्रमाणपत्र शुल्क, मालमत्ता हस्तांतर शुल्क, नकाशाची खरी नक्कल शुल्क, नकाशाची खरी नक्कल बांधकाम शुल्क, इमारत पाडणे ना हरकत दाखला शुल्क, बांधकाम पाडल्याचे प्रमाणपत्र शुल्क, झोन दाखला शुल्क, भाग नकाशा शुल्क, केबल खोदकाम शुल्क या सुविधांचे कर वाढले आहेत.

अंदाजपत्रकात आस्थापना विभागाला 14 कोटी 25 लाख 80 हजार रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 25 कोटी 78 लाख 71 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषद मालमत्तांची दुरुस्तीसाठी 6 कोटी 54 लाख 49 हजार रुपये. नवीन प्रशासकीय इमारत कामासाठी एक कोटी रुपये. भुयारी गटार योजनेसाठी 20 कोटी रुपये, नाट्यगृह बांधण्यासाठी 10 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 4 कोटी रुपये, पाणीपुरवठा 20 कोटी रुपये, शाळा क्रीडांगण 2 कोटी रुपये, अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये, भाजी मंडईसाठी 3 कोटी रुपये, शिव शंभो स्मारक एक कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन 3 कोटी रुपये, नमामि चंद्रभागा अंतर्गत 31 कोटी रुपयांची तरतूद ( Talegaon)  करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.