Pune : पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये विद्यार्थिनीने स्वतःला घेतले पेटवून ;उपचारादरम्यान तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये विद्यार्थिनीने पेटवून (Pune )घेतले आहे. उपचारादरम्यान 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हॉस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल आहे.

पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 7 मार्च रोजी हा प्रकार (Pune )घडला असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिद्धू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Maval : कंपनीमधील कामे सांगतात म्हणून मॅनेजरवर जिवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज करायचा. या सर्व प्रकारमुळे रेणुका खूप घाबरली. याशिवाय हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये राहणारी मुस्कान ही देखील रेणुकाला अभ्यास करू द्यायची नाही आणि जाणून बुजून त्रास द्यायची.

या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुका ने 7 मार्च रोजी होस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर तिचा मृत्यू झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.