Maval : कंपनीमधील कामे सांगतात म्हणून मॅनेजरवर जिवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – सतत कामे (Maval) सांगतो म्हणत कंपनी मॅनेजर वर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.19) बेबडओहळ, मावळ येथे घडली आहे.

याप्रकरणी किरण मानसिंग भोसले (वय 47 रा.मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कुमार ओझरकर (वय 25 रा.शिवणे, मावळ) व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या घटनेत सुधिर मच्छिंद्र अडसूळ (वय 47) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Pune AFMC : पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला युनिट प्रशस्तीपत्र प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुमार हा मानेग्रो कंपनीत काम करतो. तेथे च अडसूळ हे मॅनेजर पदावर काम करतात. यावेळी अडसूळ हे कंपनीतील कामे सतत सांगत असतातात याच रागातून कंपनी वरून घरी जात होते.

यावेळी (Maval) आरोपीने रागाने स्टील रॉडने डोक्यावर जोरात मारून गंभीर जखमी केले,यात अडसुळ यांची कवटी फ्रॅक्चर झाली आहे. यावरून शिरगाव परंदवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.