Talegaon Dabhade : मेथोडिस्ट चर्चच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

एमपीसी न्युज – मेथोडिस्ट चर्चच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) आणि मेथोडीस मराठी सेंटनेरी चर्च तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 7)  आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात 70 लोकांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य शिबिरात 70 लोकांची तपासणी करून विविध आजारावरच्या टेस्ट करण्यात आल्या. गरजू लोकांना मोफत उपचार व औषधांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना रो. दशरथ जांभुळकर यांनी केली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चर्चचे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जोसेफ ढालवाले हे होते. (Talegaon Dabhade) संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज सर्व गरजू लोकांना मोफत औषध रोटरी क्लबकडून दिले जातील व पुढील काळात रोटरी क्लब आपल्याला मदत करील.

Kalbhairav Jayanti : कालभैरव जयंती कार्तिक उत्सवा निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज कथा सोहळा

रो. अध्यक्ष  विन्सेट सालेर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की पुढील काळात रोटरी क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प चर्चमध्ये राबविले जातील. (Talegaon Dabhade) प्रकल्प प्रमुख रो. डॉ.युवराज बडे, सह  प्रकल्पप्रमुख रो. रूथ सालेर, खजिनदार रो.रवी दंडगव्हाळ रो.बाळासाहेब शिंदे, रो.हिरामण बोत्रे,रो. फ्रान्सिस रोजारीयो, अमरीत रोजारीयो.योगेश शिंदे हे उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.