Pune accident : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली

एमपीसी न्यूज : पुणे सातारा महामार्गावर आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली आहे.(Pune accident) पुणे सातारा महामार्गावरील दरीपुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात पाच ते सहा व्यक्ती गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

याप्रकरणी झालेली प्राथमिक माहिती अशी की, आज रात्रीच्या सुमारास नीता ट्रॅव्हल्स ची एक बस कंटेनरला धडकली आणि त्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात भरती केली आहे.

Talegaon Dabhade : मेथोडिस्ट चर्चच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

दरम्यान या अपघातानंतर इतर पाच ते सात वाहने एकमेकावर आदळली आणि परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस (Pune accident) आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.