Kalbhairav Jayanti : कालभैरव जयंती कार्तिक उत्सवा निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज कथा सोहळा

एमपीसी न्यूज – श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थान, वडगाव मावळ यांच्या वतीने 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये (Kalbhairav Jayanti) कैवल्याचा पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कथा प्रवक्ते वाणीभूषण, ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे, ओतूर (जुन्नर) हे कथेचे निरूपण करणार आहेत.

नऊ दिवसीय कार्यक्रमामध्ये रोज पहाटे पाच वाजता अभिषेक, महापूजा, आरती आणि सायंकाळी 7 ते 9 संत ज्ञानेश्वर महाराज कथा संपन्न होणार आहे.

Shikrapur : शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत 6 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

बुधवार 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 12 कालभैरवनाथ (Kalbhairav Jayanti) जयंती निमित्त देवजन्माचे कीर्तन होणार असून गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजता काल्याचे कीर्तन ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे यांचे होणार आहे, नंतर महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशआप्पा ढोरे, अनंता कुडे,किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोकराव ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह ग्रामस्थ करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.