Gahunje : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 चे तिकीट 12 हजारांना विकणाऱ्या दोघांना अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट (Gahunje) सामन्याचे 1200 रुपयांचे (Gahunje) तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे बुधवारी (दि. 18) रात्री केली. तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या क्रिकेट वर्ल्डकपचे सामने सुरु आहेत. त्यातील पाच सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर होणार आहेत. त्यापैकी भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना आज (गुरुवारी, दि. 19) दुपारी दोन वाजता येथे सुरु होणार आहे. त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये भारताचा एकही सामना नाही. भारताचा सामना असलेली आजची एकमेव मॅच आज होणार असल्याने क्रिकेट प्रेमींनी यासाठी तुफान गर्दी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार (Gahunje) होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. सध्या वेशातील पोलीस मागील काही दिवसांपासून स्टेडीयम आवारात गस्त घालत आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत.

Pune : रविवार पेठेत फ्लॅटला आग, अग्निशमन  जवानांकडून श्वानाची सुखरूप सुटका 

त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लाऊन रवी लिंगप्पा देवकर, अजित सुरेश कदम या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची 1200 रुपये दाराची पाच तिकिटे आढळली. यातील एक तिकीट ते तब्बल 12000 रुपयांना विकत होते. पोलिसांनी पाच तिकिटे, 38 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 51 हजारांचा ऐवज जप्त केला.

रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी केली (Gahunje) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.