Pune : रविवार पेठेत फ्लॅटला आग, अग्निशमन  जवानांकडून श्वानाची सुखरूप सुटका 

एमपीसी न्यूज – पुण्यातील रविवार पेठ परिसरातील यशवर्धन (Pune) प्रेस्टीज सोसायटीत पाचव्या मजल्यावर एका फ्लॅटला काल (बुधवारी) दुपारी सव्वा चारच्या सुमारास आग लागली होती. या आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी एका श्र्वानाला सुखरूप बाहेर काढले आहे.

आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून मुख्यालयातील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी  पोहोचताच जवानांनी पाचव्या मजल्यावर धाव घेतली. फ्लॅट बंद असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले.  कटावणीचा वापर करीत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याचवेळी घरामधे गृहपयोगी सर्व वस्तु मोठ्या प्रमाणात पेटल्या होत्या.

Vadgaon Maval : मागील दहा वर्षात भारताने जगाचे लक्ष वेधले – डॉ. उदय निरगुडकर

इमारतीत असणाऱ्या स्थायी अग्निशमन यंञणेचा वापर करीत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला असताना घरामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना अचानक स्वयंपाकाच्या खोलीमधून एक श्वान आगीमधे अडकल्याने बचावासाठी प्रयत्न करत असल्याचे जवानांनी पाहिले.

त्याचवेळी क्षणाचा ही विलंब न करता त्या मुक्या जीवाला श्वानाला जवानांनी उचलून घेत बाहेर घेतले असता श्वानाच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आले परंतू सुदैवाने श्वान सुखरुप असल्याची खाञी झाली. जवानांनी पंधरा मिनिटात आग पुर्ण विझवली. आगीमधे घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.

या ठिकाणी एक महिला व सोबत तिने पाळलेले श्वान राहत असून महिला कामावर गेली असल्याने श्वान घरात एकटेच होते.

 घराची मालक महिला तिथे येताच तिने “माझे घर जळाले याचे दुख आहेच पण तुम्ही माझ्या “रानू” या श्वानाला सुखरुप वाचविले याबद्दल आभार मानले.

या कामगिरीत दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर तसेच तांडेल मंगेश मिळवणे व वाहनचालक संदिप कर्णे आणि जवान चंद्रकांत गावडे, आजीम शेख, ओंकार बोंबले, सागर शिर्के, तुषार जानकर यांनी सहभाग (Pune) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.