Vadgaon Maval : मागील दहा वर्षात भारताने जगाचे लक्ष वेधले – डॉ. उदय निरगुडकर

एमपीसी न्यूज – “स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक स्थित्यंतरे अनुभवली, काही ( Vadgaon Maval) गोष्टी चांगल्या घडल्या तर काही होण्याची अजिबात गरज नव्हती. देश त्याचे परीणाम भोगतोय परंतु मागील दहा वर्षांत अनेक आघाड्यांवर भारताने जी पाऊले उचलली आहेत ती जगाचे लक्ष वेधून घेणारी आहेत, असे मत डॉ उदय निरगुडकर यांनी सरस्वती व्याख्यानमालेत व्यक्त केले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. निरगुडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबर साप्ताहिकाचे संपादक सुरेश साखवळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त किरण काळे, संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ रविंद्र आचार्य यांच्यासह अध्यक्ष श्रीराम ढोरे, कार्यक्रम प्रमुख अर्चना कुडे, कार्याध्यक्ष सारीका भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune : पुण्याचा पारा 34 वर ; 25 ऑक्टोबरपर्यंत राहणार उन्हाचा तडाखा

“विविध क्षेत्रांत भारत झपाट्याने प्रगती करत असताना अनेक विकासात्मक कामे कुठल्याही भौगोलिक विषमतेशिवाय होत असून त्यामुळे महासत्तेच्या दिशेने जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर देशाने अनपेक्षित यश मिळवले आहे” असे पुढे बोलताना निरगुडकर म्हणाले.

“कठीण परिस्थितीमध्ये जिद्द बाळगून ध्येयाकडे जाण्याची चिकाटी सोडली नाही तर खूप काही साध्य करता येते” असे मत पोलिस अधिकारी किरण काळे यांनी व्यक्त केले.

“पुढे पुढे जात असताना मावळ विचार मंचाने रौप्यमहोत्सवी वर्षात अधिक भव्यदिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करावे ” अशा शुभेच्छा अध्यक्षीय मनोगतामध्ये सुरेश साखवळकर यांनी दिल्या.

राष्ट्रपती पारितोषिक विजेते कान्हेवाडी येथील आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांना मावळ विचार मंचाच्या वतीने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाघमारे यांनी केले, सन्मानपत्र वाचन हर्षदा दुबे यांनी तर मा.नगरसेवक रविंद्र काकडे यांनी ( Vadgaon Maval) आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.