Pune : पुण्याचा पारा 34 वर ; 25 ऑक्टोबरपर्यंत राहणार उन्हाचा तडाखा

एमपीसी न्यूज – सध्या ऑक्टोबर हिट ने नागरिक चांगलेच हैराण झाले ( Pune ) आहेत. उन्हाचा हा तडाखा संपूर्ण राज्यभर जाणवत आहे. पुण्याचे तापमान ही 34 अंश सेल्सिअसवर गेले आहे. हे तापमान वाढून 36 अंशावर जाण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. उन व उष्णता येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून पावसाची कोणतीही चिन्हे नसल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Alandi : आळंदीत नवरात्रीनिमित्त दांडिया व विविध स्पर्धेचे आयोजन

सकाळी काहीशी धुक्याची झालर, सुखद अशी थंडी व त्यानंतर दुपारी उन्हाचा कडाका असा ( Pune ) काहीसा हवामान बदल सध्या नागरिक अनुभवत आहेत. राज्यातून मोसमी वारे माघारी गेल्यानंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे.

त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत असल्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती 25 ऑक्टोबपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 14 दिवस आधीच मोसमी वारे राज्यातून बाहेर गेले आहेत.या कालावधीत सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे सूर्याची किरणे सरळ जमिनीवर पडत असल्याने उष्णता वाढते, हवेतील आर्द्रता कमी होते.

यंदा एल-निनोचे वर्ष असल्यामुळे पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडला आहे.हिवाळ्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात ( Pune ) येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.