Dehugaon : मातांना शाळेत बोलावून मापुस्कर गुरुकुलमध्ये  गुरुपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज –  पहिली गुरू ही आई असते , त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत बोलावून त्यांना वंदन व त्यांची पुजा करून अनोख्या पध्दतीने पद्मश्री विजेते डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित देहूगाव (Dehugaon) येथील सुनिती विद्यालयं, मापुसकरांचे गुरुकुल  येथील शाळेमध्ये  सोमवारी (दि.3) गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.

MNS : लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम – वसंत मोरे

आपली पहिली गुरु आई असते, परंपरेची जोपासना करत समस्त विद्यार्थ्यांच्या मातांना विद्यालयांमध्ये सन्मानपूर्वक निमंत्रित करून सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या आईचे पाय धुतले व  चंदनपुष्प अर्पण करून त्यांची पूजा केली व मनोभावे वंदन केलं. आपल्या मुलांनी आपापल्या मातांचं गुरुपौर्णिमेनिमित्त खऱ्या अर्थाने केलेलं हे मातृ वंदन पाहून सर्व माताही भारवल्या.

विद्यार्थ्यांना या प्रकारे संस्कारित करत असताना मातृत्व हा नेहमी गौरवाचाच विषय असतो भारतीय संस्कृती व आधुनिकता यांचा संगम साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुनिती विद्यालयं, मापुसकरांचे गुरुकुल मध्ये वेळोवेळी होत राहणार आहे असं सुनिती विद्यालयाच्या प्रा. सोनाली मापुस्कर यांनी सांगितलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.