MNS : लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – सोशल मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. एखाद्या विषयाची माहिती घेऊन ती पोस्ट केली तर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते. माहितीमधील सत्यता आणि गांभीर्य विचारात घेताना लोकांचे हित आपल्याला कळले पाहिजे.

Pune : सनातन संस्था आयोजित ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा 

याचा विचार करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत सहज पोहचवू शकतो. त्याचा वापर प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने केला पाहिजे, असे मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस वसंत मोरे यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रभावी मतदार यादी वाचन व मतदार नोंदणी आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या विषयावर रविवारी (दि. 2) आयोजित कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती कार्यालयात पार पडले.

शिबिरात राज्य सरचिटणीस तथा पिंपरी-चिंचवड प्रभारी रंजीत शिरोळे, राज्य सरचिटणीस वसंत मोरे, बाळा शेडगे, बाबू वागस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसेचे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पहिल्या सत्रात ऑनलाइन मतदार नोंदणी कशा पद्धतीने करायची तसेच दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे व स्थलांतरित मतदार अर्ज कसा भरावा? हे समजवून सांगितले. प्रत्येक विधानसभेप्रमाणे बीएलओ यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीत आपल्या भागाव्यतिरिक्त अन्य कोणाचे बोगस मतदान जोडले आहे का?

याची कशा पद्धतीने माहिती घ्यायची. त्यांची माहिती अधिकारांमध्ये आपण माहिती मागू शकतो. तसेच, मतदार यादी फोडून ती प्रत्येक बूथप्रमाणे कशी पाहायची व त्यामध्ये कोणते बारकावे शोधायचे?, हे बाळा शेडगे यांनी समजावून सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शेडगे यांनी दिली.

दुसऱ्या सत्रात सोशल मीडियाचे फायदे व तोटे यावर वसंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. लोकांच्या घरात पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. ते कसे वापरावे याचा अभ्यास करून पोस्ट करता आली पाहिजे. सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यायची, त्यांचे फायदे आणि तोटे काय?

एखादी पोस्ट करताना त्याची काळजी कशी घ्यावी, अशा सर्व विषयांचा अभ्यास करूनच विषय सोशल मीडियावर पोस्ट करावा, सोशल मीडियामुळे आज मी कुठपर्यंत पोहोचलो आहे. सोशल मीडियाची ताकद काय आहे, हे आज तुम्हाला माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून लक्षात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष विशाल मानकर यांनी केले. नियोजन उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी केले – आणि
आभार शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.