Chinchwad : एच.वाय.टी. इंजिनियरिंग कंपनीत कर्मचारी झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) एम.आय.डी.सी. येथील एच.वाय.टी. इंजिनियरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी मधील कामगार तसेच कर्मचाऱ्यांना चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

Pune : वीजसुरक्षेसाठी महावितरणकडून तब्बल 39 लाख ग्राहकांशी संवाद

यावेळेस कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी लॅंडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होताच सर्वांनी एकाच जल्लोष केला तसेच ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण झाला. कामगारांमध्ये तसेच कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले.

चांद्रयान-२ च्या अपयशानंतर खचून न जात भारताने ज्या प्रकारे चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण घेतले. हे भारताची जगाच्या पाठीवर अंतरिक्ष महासत्ता म्हणून नवीन ओळख बनवेल असा आशावाद देखील काहीं कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भोजराज तेली तसेच जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर राजश्री तेली यांनी या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढाकार घेतला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.