Katraj Bogda : आता कात्रज बोगदा ते नवले पुल दरम्यान जड वाहने धावणार 40 किमी वेगाने

एमपीसी न्यूज – कात्रज बोगदा (Katraj Bogda )व नवले पुलादरम्यान सतत होणाऱ्या अपघांतामुळे पुणे वाहूतूक पोलिसांनी आता जड वाहनांसाठी वेग मर्यादा ठरण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई- बंगळूरू महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पूल या परिसरात जड वाहनांना 40 किमी वेगाने जाता येणार आहे.

Swargate : वाहन चालकांकडून पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल; वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी निलंबित

हा बदल प्रायोगीक तत्वावर असून 19 मे रोजी मध्य रात्री 1 वाजे पासून 25 मे रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत राहणार आहे. यासंदर्भात पुणे वाहतूक पोलीस शाखेने परिपत्रक जाहीर केले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, या परिसरात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण अनण्यासाठी परिसरात पाहणी व अभ्यास केला गेला. कात्रज बोगदा ते नवले पुल या भागात सर्वाधीक अपघात हे जड वाहनांमुळे झाले आहे. घाटातून वेगात येणारी वाहाने, तसेंच त्यांची ब्रेकींगस्स्टीम ही बऱ्याचेवेळा (Katraj Bogda ) योग्य प्रकारे चालत नाही.

त्यामुळे हे अपघात होत आहेत. त्यामुळे या वहानांचती वेग मर्यादा कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही वेग मर्यादा 40 किमी प्रतीतास करावी, असे मत समितीमध्ये चर्चेअंती मांडण्यात आले.

या अवजड वाहनांमध्ये ट्रॅक्टर -ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेईकल्स, ट्रक-ट्रेलर, मल्टी अॅक्सल, कंटेनर अशा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.यात थ्यावश्यक सेवा जसे की, रुग्णवाहिका, पोलीसांचे वाहन किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना सुट असणार आहे.

तरी नागरिकांना काही सुचना करावयाच्या असल्यास 26 मे पर्यंत सकाळी 11 वाजे पर्यंत त्यांच्या सुचना या वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं.6, जेलरोड, येरवडा, (Katraj Bogda )पुणे येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जमा कराव्यात अशे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.