Talegaon Dabhade : आचार्य बाळशास्री जांभेकरांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची समाजाला गरज – सुरेश साखवळकर

एमपीसी न्यूज – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. सुरेश साखवळकर यांनी तळेगाव मध्ये (Talegaon Dabhade )केले.

Katraj Bogda : आता कात्रज बोगदा ते नवले पुल दरम्यान जड वाहने धावणार 40 किमी वेगाने

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथी निमित्ताने तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहर पत्रकार संघाचे वतीने आयोजित अभिवादन सभेत पं साखवळकर हे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मनोहर दाभाडे हे होते.

यावेळी बोलताना पं.साखवळकर म्हणाले की आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा काळ अतिशय खडतर होता. आपल्या देशात इंग्रजाची एकहाती सत्ता होती. तर (Talegaon Dabhade) भारतीय समाज विविध जाती धर्म रुढी परंपरांमध्ये अडकल्याने समाजात एकी नव्हती. अशावेळी आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी आपली निर्भिड लेखणी चालवली.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. पत्रकार संघाचे सचिव सोनबा गोपाळे गुरूजी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राजेश बारणे यांनी आभार मानले.

यावेळी बी एम भसे, सोनबा गोपाळे गुरूजी, सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे, अतुल पवार, प्रभाकर तुमकर, राजेश बारणे, राजेंद्र जगताप, श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.