Hinjawadi : पार्सल कस्टममध्ये अडकले आहे सांगत महिलेची 37 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : कस्टममध्ये तुमचे बेकायदेशीर पार्सल अडकले (Hinjawadi) आहे, म्हणत महिलेची तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक मंगळवारी (दि.8) घडली.

या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून live:Cid.b07cd225843044C1 या अकाउंट धरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोन केला, तुमचे पार्सल कुरिअर कस्टममध्ये अडकले आहे. त्यात पासपोर्ट, लॅपटॉप, 800 ग्रॅम गांजा व 140 एमडी एमए आहे.

Pune : जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर फिर्यादीकडून पैसे (Hinjawadi) मागितले. मागणीनुसार, 36 लाख 99 हजार 999 रुपये घेतले. परंतु, आपली फसवणूक झाली आहे. हे लक्षात येताच फिर्यादी ने पोलिसांकडे तक्रार केली. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.