Hinjawadi : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने पादचाऱ्याला (Hinjawadi ) धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर हिंजवडी येथे घडली.

पोलीस अंमलदार उदयराज माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळ मार्गावर हिंजवडी येथे एका भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली.

Bhosari : कासारवाडी येथे भोसरी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, गंभीर जखमी (Hinjawadi) झालेल्या पादचाऱ्याचा या अपघातात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.