Bhosari : कासारवाडी येथे भोसरी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज – कासारवाडी (Bhosari) येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर भोसरी पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 21) सायंकाळी करण्यात आली.

विकास नरेंद्र साहू (वय 21, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरविंद जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : निगडीतील अभिश्री राजपूतची एशियन योगा गेम्ससाठी भारतीय कोच म्हणून निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कासारवाडी येथील योगीराज हॉटेल मध्ये ग्राहकांना जेवणासोबत धूम्रपान यासाठी हुक्का पुरवला. त्याने हॉटेलमध्ये हुक्का बार चालवला असल्याची माहिती मिळाली असता भोसरी पोलिसांनी छापा मारून कारवाई करत आठ हजार 490 रुपयांचा हुक्का (Bhosari) फ्लेवर, हुक्का पॉट आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.