Nigdi : निगडीतील अभिश्री राजपूतची एशियन योगा गेम्ससाठी भारतीय कोच म्हणून निवड

अमित गोरखे यांनी केला सन्मान

एमपीसी न्यूज – श्रीलंका येथे 26 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्ससाठी निगडी (Nigdi) येथील  अभिश्री राजपूत यांची भारतीय संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी तिचा सन्मान केला.

Pimpri : खासगी सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी  यांनी ही निवड केली आहे. अभिश्री या कोया फिटनेस अकॅडमीच्या संस्थापक असून त्यांच्या संघटनेतून पिंपरी-चिंचवड मधील  13 मुलींची या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये अनुष्का रानडे, आर्या जाधव, कश्र्वी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित, मुक्ता जाधव, त्रिशा बंसल,  ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे,जानवी मुळूक, अनविका वायकर,या सर्वांची निवड झाली आहे.

24 ऑगस्ट रोजी हा संघ एशियन गेम्स साठी रवाना होईल या सर्वांना अमित गोरखे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व अभिश्री यांचा सन्मान करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.