Pimpri : बसमध्ये नागरिकांचा कापला खिसा, रोख 90 हजार रुपये चोरीला

एमपीसी न्यूज – बसमधून प्रवास करत असताना एका नागरिकाचा खिसा चोरांनी कापला. यामध्ये चोरांनी तब्बल रोख 90 हजार रुपये चोरून नेले आहेत. हि घटना रविवारी (दि.3) एम्पायर इस्टेट बस स्टॉप ते मोरवाडी या प्रवासा दरम्यान घडली आहे.

Vadgaon Maval : मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; मराठा समाजाकडून जालना येथील लाठीमाराचा निषेध

याप्रकरणी दत्तात्रय सोपान भोसले (वय 51 रा. हिंगणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बसमधून काळभोरनगर ते दांडेकर पूल असा बस प्रवास करत होते. यावेळी बसमध्ये कोणीतरी त्यांच्या पँन्टचा खिसा कापला. यावेळी त्यांच्या खिशातून 90 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.