Pimpri : 100 वाहन चालक पीएमपीएमएलकडे वर्ग, मेस्कोकडून 60 कंत्राटी चालक घेणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या (Pimpri) विविध विभागात कार्यरत असलेले 100 वाहन चालक पीएमपीएमएलकडे वर्ग झाल्याने पालिकेला वाहन चालकांची मोठी कमतरता जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची कंत्राटी पद्धतीने महापालिका प्रशासन करणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे (मेस्को) वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात पीएमपीएमएलचे 100 वाहन चालक कार्यरत होते. मात्र, प्रशासनाने आपल्या सर्व वाहन चालकांना पीएमपीमध्ये हजर होण्याच्या सूचना दिल्याने हे सर्व चालक पीएमपीमध्ये हजर झाले आहेत. महापालिका प्रशासनानेही हे सर्व चालक पीएमपीकडे वर्ग केले आहेत.

Pimpri : बसमध्ये नागरिकांचा कापला खिसा, रोख 90 हजार रुपये चोरीला

त्यामुळे आता महापालिकेच्या रूग्णवाहिका, अग्निशमन, अतिक्रमण यासह विविध विभागांना वाहन चालकांची कमतरता जाणवत आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची भरती करणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ हे (Pimpri) राज्य सरकारच्या पॅनेलवरील संस्था आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने कंत्राटी वाहन चालकांची भरती केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.