Pune : आयकर विभाग, हॉकी लव्हर्स, पीसीएमसी संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश !

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा  
 
एमपीसी न्यूज – कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत हॉकी युनायटेड, एसआरपीएल आणि एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

 
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अ गटात हॉकी युनायटेड संघानेसातारा इलेव्हन संघाचा 5-0 असा पराभव केला. यामध्येअंकित गौड याने दोन गोल केले. ए. यादव, गुफ्रान शेख व प्रतीयो डब्ल्यू यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. ड गटाच्या सामन्यात एसआरपीएफ, पुणे संघाने विक्रांत वॉरीयर्सचा 6-0 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वृशेष गंकोप व संदेश मोरे यांनी प्रत्येकी दोन तर, रोहन पवार व जितेश नलावडे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. क गटाच्या सामन्यात एक्सलन्स अ‍ॅकॅडमी संघाने अस्पत अ‍ॅकॅडमी संघाचा 7-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामन्यात युवराज वाल्मिकी याने चार गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला.  
 
याआधी आयकर विभाग संघ, हॉकी लव्हर्स आणि पीसीएमसी या संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. स्पर्धेचा सविस्तर निकालः 1) गट अः हॉकी युनायटेडः 5 (अंकित गौड 9, 16 मि., ए. यादव 31 मि., गुफ्रान शेख 42 मि., प्रतीयो डब्ल्यु.) वि.वि. सातारा इलेव्हनः 0; 2) गट ईः जीएसटी अँड कस्टमः 13 (मुदीप केरकेटा 1, 37 मि., सलमोना लाकरा 5 मि., सौजीप एल्डा 10, 32 मि., अभिराम लुंगून 12 मि., संग्राम पोकळे 19, 41, 43 मि., विकास पिल्ले 21 मि., फेलिया बोआ 36, 39 मि., अभिषेक स्वामी 44 मि.) वि.वि. ग्रीन मेडोज्ः 0; हाफ टाईम 6-0; 3) गट डः एसआरपीएफ, पुणेः 6 (वृशेष गंकोप 4, 6 मि., संदेश मोरे 8, 12 मि., रोहन पवार 17 मि., जितेश नलावडे 49 मि.) वि.वि. विक्रांत वॉरीयर्सः 0; हाफ टाईम 5-0; 4) गट कः एक्सलन्स अ‍ॅकॅडमीः 7 (युवराज वाल्मिकी 9, 28, 39, 40 मि., सौरभ पाटील 34 मि., प्रिन्स् चौरसिया 45 मि., अनिकेत सकपाळ 47 मि.) वि.वि. अस्पत अ‍ॅकॅडमीः 1 (शुभम ठाकूर 24 मि.); हाफ टाईमः 1-1;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.