Pune : चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने पुण्यात हलविणार

एमपीसी न्यूज – चेन्नईतील आयपीएल सामन्यादरम्यान झालेल्या बुट फेकण्याच्या घटनेनंतर चेन्नईत होणारे सामने पुण्यात हलविण्यात आले आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

आयपीएलचे सात सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार होते. यापैकी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी सामना झाला. यावेळी चेन्नई संघ क्षेत्ररक्षण करत असताना आठव्या षटकाच्या दरम्यान मैदानावर बूट फेकण्याचा प्रकार घडला. रवींद्र जडेच्या दिशेनं हा बूट फेकण्यात आला होता. यावेळी तो लाँग ऑनला उभा होता. 

चेन्नई पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेतलं होतं. मात्र या घटनेनंतर चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने अन्यत्र हलविण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला असून हे सामने पुण्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका या सामन्याला बसला असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.