India : कुस्तीपटुंकडून आंदोलन मागे ;. “रस्त्यावर नव्हे तर आता न्यायालयात लढाई”

एमपीसी न्यूज – रेसलिंग फेडेरेशन ऑफ इंडिया (डब्ल्यूएफआय) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर (India) महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करून दिल्लीमध्ये ब्रिजभूषण सिंहना अटक व्हावी यासाठी रस्त्यावर आंदोलन केले जात होते. आंदोलक कुस्तीपटूंनी जाहीर केले आहे की डब्ल्यूएफआयचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात खटले न्यायालयात सादर केले आहेत, त्यामुळे ते आता रस्त्यावर नव्हे तर न्यायालयात लढा देत राहतील.

सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या निवेदनात, आंदोलक कुस्तीपटूंनी म्हटले आहे की पुढील डब्ल्यूएफआय अध्यक्ष आणि कार्यकारी समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि 11 जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा बघत राहतील अशी सुद्धा आंदोलकांनी भूमिका घेतली आहे.

एका अल्पवयीन कुस्तीपटूसह सात महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण सिंह यांचा विरोधात दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच असे कळून आले आहे की अल्पवयीन कुस्तीपटूने दंडाधिकार्‍यांसमोर तिचे निवेदन मागे घेतले आणि सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत नवीन नोंद केली आहे.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीनंतर 15 जून रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र सादर केले होते.

23 जून रोजी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने जाहीर केले होते की, साक्षी मलिक व तिचा पती सत्यवर्त कादियन, विनेश फोगट, संगीता फोगट व तिचा पती बजरंग पुनिया आणि जितेंद्र किन्हा या सहा कुस्तीपटूंना त्यांच्या चाचण्यांमधील विजेत्यांविरुद्ध निवड होण्यासाठी फक्त एक सामना जिंकावा लागेल.

ह्या कुस्तीपटूंचा  या आंदोलनात वेळ गेला असल्याने ते सरावापासून दूर आहेत हे लक्षात घेऊन, सरकारने त्यांच्या चाचण्या ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या होत्या तर इतर कुस्तीपटूंना जुलैमध्येच चाचण्यांसाठी हजर राहावे लागेल.

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी काही दिवस सोशल मीडियापासून दूर असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेला कुस्तीगीरांचा विरोध संपुष्टात आल्याचे दिसत (India)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.