Alandi : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदीला पुन्हा हिमनदीचे रूप

एमपीसी न्यूज – दि.27 जून रोजी इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे (Alandi) पुन्हा फेसाळली. इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यावर  मोठ्या प्रमाणात तरंगणारा फेस पाहून काही नागरिकांनी आज तिला हिमनदीची उपमा दिली आहे.

Pune : पुण्यात सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव होणार संपन्न

इंद्रायणी नदीच्या पाण्यावर जणू बर्फ तरंगत असल्याचा भास निर्माण होत होता. हे दृश्य टिपण्यासाठी अनेक नागरिक श्री ज्ञानेश्वरी मंदिर जवळ असणाऱ्या पुलावरती येत होते.काल दि.26 रोजी सुद्धा इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली होती.
इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळली दिसून येत (Alandi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.