ISA Jyot : आयएसए ज्योतचा स्वीकार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माया भालेराव करणार

एमपीसी न्यूज : आयएसए ज्योतचा (ISA Jyot) स्वीकार 9 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड भुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने शहर अध्यक्ष डॉ. माया भालेराव करणार आहेत. हा कार्यक्रम भक्ती शक्ती चौक, निगडी येथे होणार आहे. त्यानंतर सर्व भुलतज्ज्ञ स्टर्लिंग हॉस्पिटल येथे सीपीआरचे (CPR) प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.

भालेराव म्हणाल्या, की 16 ऑक्टोबर हा ‘जागतिक भूल शास्त्र दिवस’ जगभरात साजरा केला जातो. या वर्षी अखिल भारतीय भूल तज्ञ संघटना (Indian Society of Anaesthesiologists – ISA) 75 वर्षे पूर्ण करत असून अमृत महोत्सव साजरा करत आहे. या दोन्हीची औचित्य साधत अखिल भारतीय भूल तज्ञ संघटनाने ISA ज्योत ही संकल्पना घेऊन भूल शास्त्रविषयी विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे देशव्यापी आयोजन करणार आहे. ही ISA ज्योत अनेक शहरातून मार्गस्थ होत 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीला कर्तव्यपथ येथे शानदार सोहळ्यात सांगता होणार आहे.

Chikhali Crime : पादचारी महिलेचे चार तोळ्याचे गंठण हिसकावले

ISA ज्योती एकात्मता बंधुभाव प्रत्येक रुग्णाला वेदनारहित सुरक्षित आणि प्रगत भूल यांचे (ISA Jyot) प्रतीक आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड भूल तज्ञ संघटना सचिव डॉ. सीमा सुर्यवंशी व जीसी मेंबर डॉ. सुमित लाड यांनी दिली. यावेळी खजिनदार डॉ. भावेश सेठ, माजी अध्यक्ष डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. रत्नदीप मार्कंडेय, डॉ. शोभा जोशी, डॉ. डी. वाय. पाटील विभाग प्रमुख डॉ. छाया सूर्यवंशी, सभासद डॉ. राजेश मंगल, डॉ. शोभा वटकर, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.

भालेराव म्हणाले, की 16 ऑक्टोबरपर्यंत 15 हॉस्पिटल कॉलेजेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, अनेक भूल तज्ञ विविध हॉस्पिटल व सोसायटीमध्ये CPR चे ( जीवन संजीवनी) प्रात्यक्षिक, मार्गदर्शनपर व्याख्याने सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष बोल कशी दिली जाते? सुरक्षित भूल म्हणजे काय? त्यासाठी रुग्णाचे सहकार्य किती महत्त्वाचे आहे? योग्य सीपीआर कसा द्यावा? भूलीविषयी समज गैरसमज यांची माहिती देऊन नागरिकांचे शंका निरसन केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.