Chikhali Crime : पादचारी महिलेचे चार तोळ्याचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – शेजारील महिलेसोबत पायी जाणाऱ्या महिलेचे चोरट्यांनी चार तोळ्याचे गंठण हिसकावले आहे. हा प्रकार बुधवारी (दि.5) रात्री सव्वा दहाच्या सुमारास (Chikhali Crime) चिंचवड येथील महात्मा फुले नगर येथे घडला.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात दोन मोटारसायकल स्वारावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

Chikhli Crime : समजावून सांगितले म्हणून तरुणावर केला शस्त्राने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शोजारी राहणाऱ्या महिलेसोबत (Chikhali Crime) पायी चालत जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकीवर आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे 4 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.