Chikhli Crime : समजावून सांगितले म्हणून तरुणावर केला शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – मित्राशी भांडत असल्याच्या कारणाने समजावून सांगितले म्हणून एकाने शस्त्राने वार करत तरुणाला गंभीर जखमी केले (Chikhli Crime) आहे. हा प्रकार बुधवारी (दि.5) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला.

महेश रतन रोकडे (वय 27 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनिकेत कैलास जरांडे (वय अंदाजे 20) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र रोहन जाधवसह थांबले असता रोहन याने समोर गिरणीजवळ उभी असलेली व्यक्ती विनाकारण रोज माझ्याशी भांडते, तू त्याला समजावून सांग असे फिर्यादीला म्हटले. यावरून फिर्यादी यांनी आरोपीला भांडणाविषयी समजावून सांगितले.

PCMC News: दिव्यांगांना दिवाळी भेट; सामान्य करात 50 टक्के सवलत

याचा राग मनात धरून आरोपीने शस्त्राच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या कानावर, मानेवर व पायाच्या पंज्यावर वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तर, फिर्यादी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.