Dehuroad Crime : भाजी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – भाजी विक्रेत्याला (Dehuroad Crime) तिघांनी दगड व बांबूने मारहाण केली होती. हा प्रकार बुधवारी (दि.5) रात्री साडे दहा वाजता देहूरोड ब्रीज खाली घडला. यावरून देहूरोड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

राहूल श्रीभगवान रिडलान (वय 29), मुन्ना उर्फ श्रीभगवान रिडलान (वय 27) व बाबू बाराप्पा तेलगु (वय 33, सर्व राहणार पारशी चाळ देहूरोड) यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी अल्ताफ अस्लम रंगरेज (वय 22, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

Chikhali Crime : पादचारी महिलेचे चार तोळ्याचे गंठण हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा भाऊ इकबाल रंगरेज व मित्र यांच्यासह (Dehuroad Crime) बोलत उभे होते. यावेळी आरोपी आले व त्यांनी थेट फिर्यादी यांना बांबू व दगडाने मारहाण कऱण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीच्या मित्रांनाही मारहाण करत जखमी केले. यावरून देहूरोड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.