Jawan Movie : वास्तवाची झालर घेऊन व्यवसायिक होणारा ” जवान”

एमपीसी न्यूज – कधी कधी व्यवस्थेशी लढत असताना, दुसऱ्याला आणि स्वतः:ला न्याय देता देता आपण खलपात्र कधी होतो (Jawan Movie) हे कळतच नाही, ज्याला खलपात्र म्हणून रंगवलं जातं तो वाईट असेलच असंही नाही. त्याची सुद्धा काहीतरी बाजू असू शकते हे कोणी लक्षातच घेत नाही आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा त्या चांगुलपणाला एक दुःखाची किनार लाभलेली असते. पिढ्यान पिढ्या हेच चालू आहे.या सगळ्यातून संकटांचा मुकाबला करत जो पुढे जातो तोच हा जवान.

या जवान ला इतरांना न्याय द्यायचा आहे. त्याच्यासाठी मार्ग हा मार्ग आहे तो चांगला की वाईट याची त्याला फिकीर नाही. अर्जुनाप्रमाणे त्याला फक्त तो माशाचा डोळा दिसतोय. एका अर्थाने त्याला समाजाची फिकीर आहे तर दुसऱ्या अर्थाने समाज त्याच्याविषयी काय विचार करतो याचा तो विचार करत नाही.जवान या चित्रपटाविषयी समाज माध्यमांवर खूप बोलणं होत आहे. काही लोकांनी असा समज करून घेतला आहे की हा चित्रपट सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहे. काही असेही म्हणतात की, शाहरुखने व्यवस्थेविरुद्ध आपल्या आत असलेल्या रागाला वाचा फोडली आहे.

Talegaon Dabhade : अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

चित्रपट बघण्याच्या आधी मी सुद्धा असेच काहीतरी विचार करत हा चित्रपट बघायला गेलो होतो.पण हा चित्रपट जसा जसा सरत गेला तसं तसं माझ्या समजाचे रूपांतर गैरसमजात होत गेले. हा चित्रपट त्याच्या पलीकडे आहे. हा चित्रपट तद्दन व्यवसायिक आहे. याच्यात सगळा मसाला आहे. चित्रपटगृहात प्रत्येकच संवादावर नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या या चित्रपटाने खेचल्या आहेत.पण या चित्रपटाच्या मागची पार्श्वभूमी जर आपण डोळसपणे तपासली तर आपल्या असे लक्षात येईल की हा चित्रपट हा फक्त शाहरुखचा नाहीये. तर दक्षिणेकडचा लोकप्रिय आणि महान दिग्दर्शक एंटली याने हा चित्रपट दिग्दर्शित (Jawan Movie) केला आहे. आणि त्याच्या चित्रपटांचे हे वैशिष्ट्यच असते, की त्याच्या प्रत्येकच चित्रपटात वास्तविकतेला अनन्य साधारण महत्व असते. प्रत्येकच समस्येवर तो काहीतरी भाष्य करू पाहत असतो.

याही चित्रपटात त्याने सुरुवातच शेतकऱ्यांची आत्महत्या या अत्यंत संवेदनशील विषयाने केली आहे. चित्रपट जसजसा पुढे जातो तसं (Jawan Movie) आरोग्य सेवेतील प्रशासकीय आणि शासकीय निष्काळजीपणावर त्याने बोट ठेवल आहे. चित्रपट जसजसा समाप्तीकडे येतो, तेव्हा शाहरुखच्या तोंडी सर्वांचे डोळे उघडणारा एक संवाद आहे. ज्यामध्ये आपण मतदान करताना ते डोळसपणे केलं पाहिजे, आपण ज्याला मतदान करतो त्याला आपण चौकसपणे प्रश्न विचारले पाहिजेत. जसं आपण दुकानात, किंवा मार्केटमध्ये एखादी क्षुल्लक वस्तू घेताना जसे आपण हजार प्रश्न विचारतो. मग आपण जो आपलं भवितव्य ठरवू शकतो, महागाई की स्वस्ताई हे जो ठरवू शकतो अशा लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याच्या वेळी आपण गप्प का बसतो? समस्यांवर आपण बोललं पाहिजे. आणि इथेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. हे सिद्ध होतं.

Pimpri : फेरीवाला बोगस सर्वेक्षण रद्द करा; फेरीवाला समितीची मागणी

हा अत्यंत विचार करणारा संवाद झाल्यानंतर आपण विचार करत असतानाच शेवट पुन्हा एकदा अत्यंत व्यावसायिकपणे मसाला टाकत टाकत पुढच्या भागाची चाहूल देत हा चित्रपट संपतो. आणि आपण आधीच्याच मुद्द्याचा विचार करत करत थिएटर मधनं बाहेर पडतो.खरंतर हेच या चित्रपटाचे यश आहे. बाकी सगळा चित्रपट सोडून फक्त याच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आणि आपण करत (Jawan Movie) असलेल्या मतदानाच्या बाबतीत, आणि आपल्या प्रश्न विचारण्याच्या बाबतीत अन गप्प राहण्याच्या बाबतीत हा चित्रपट बरंच काही बोलून जातो. आणि या मुद्द्यावर आपण समाज माध्यमावर खूप मनमोकळेपणाने बोलतोय.

खरंतर व्यावसायिक चित्रपट किंवा मसालेदार चित्रपट हे बघून सोडून द्यायचे असतात. त्याचा फार विचार करायचा नसतो. पण जवान हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो. काही मुद्यांशी आपण सहमत नसू ही पण यातला चांगला भाग हा की चित्रपट हा फक्त फुटकळ मनोरंजनासाठी नाही की काहीतरी विचार मांडणारा असला पाहिजे. आणि म्हणूनच हा चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा असा झाला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक एंटली आहेत तर लेखन रमणगिरीवासन,सुमित अरोरा आणि एंटली यांनी तर संकलन एंथनी. एल.रूबेन यांनी तर संगीत दक्षिणेकडील सुप्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी . तर जी.के विष्णू यांनी या चित्रपटाचे उत्तमरीत्या छायाचित्रण केलं आहे.तर गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे. तुम्ही जर शाहरुख चे किंवा एटली चे फॅन असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच (Jawan Movie) आहे.

–   लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.