Talegaon Dabhade : अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित (Talegaon Dabhade) करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,अखंड वीणा पहारा यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम यानिमित्त आयोजित करण्यात आले. तळेगाव परिसरातील भाविकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या सोहळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांचे हस्ते करण्यात आले होते. यावेळी  ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, यतिनभाई शहा, किरण गवारे,अतुल देशपांडे, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल फाकटकर, किशोर भेगडे  आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नेतृत्व ह भ प निवृत्ती महाराज फाकटकर यांनी केले होते.अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती आणी पूजा तसेच प्रवचन किर्तन   हरिपाठ व अखंड वीणा पहारा  महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

Pimpri : फेरीवाला बोगस सर्वेक्षण रद्द करा; फेरीवाला समितीची मागणी

या सप्ताहात ह.भ.प.राजाराम मुऱ्हे, पांडुरंग गायकवाड,तुकाराम नेवाळे, गुलाब कुंभार,देवराम खराटे,बबनराव डोरले, विजय कुवळेकर चिदंबरेश्वर किसनमहाराज साखरे यांची प्रवचने संपन्न झाली.

याशिवाय दररोज संध्याकाळी ह.भ.प  ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,ज्ञानेश्वर  नामदास,विनायक निघोट,भगवान  कराड,मधुसुदन शास्री,पुरुषोत्तम  पाटील,पुंडलिक मोरे, डाॅ यशोधन महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.

दुपारी पालखीची ग्रामप्रदक्षिणा व दिंडी सोहळा भाविकांच्या  प्रचंड  सहभागात काढण्यात आली. या सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी विविध  भागातील रस्त्यावर रांगोळ्या व फुलांच्या सजावटी करुन केले. याशिवाय सर्व भाविकांचे स्वागत ओवाळून व आरत्या करुन करण्यात आले. अखेर समारोप मंदिरात  महाआरती व महाप्रसादाचे वाटप  करून करण्यात (Talegaon Dabhade) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.