Chikhali Chainsnatching News : पती सोबत शतपावली करणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – रात्री जेवण झाल्यानंतर पती सोबत शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री ऐश्वर्यम हमारा सोसायटी जवळ चिखली येथे घडली.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad News : शस्त्र घेऊन रील करणे पडले महागात, रील नंतर थेट रवानगी तुरुंगात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत शतपावली करीत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे 35 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.