AAP : डॉ.अनिल रॉय यांच्या नेतृत्वात काळभोर नगर येथील कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

एमपीसी न्यूज : आम आदमी पार्टीमध्ये डॉ. अनिल राॅय यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे. त्यांच्या नेतृत्वात काळभोर नगर भागातील मोठ्या प्रमाणावर (AAP) कार्यकर्त्यांनी रविवारी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. 

यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष किसन चावरिया, डॉ.अजय काळे, सुनील लखन, विजय सावरिया, निलेश रेवन, जयाताई परमार, बसवराज नाटेकर, किरण उंबरे, दीपक कोटीयाना, गोपालजी चावरीया, श्रीकांत जाधव , अशा अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

त्यांचा प्रवेश आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजयजी कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आप संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, (AAP) डॉक्टर अमर डोंगरे, अशोक लांडगे, सिताताई केंद्रे, के.टी बारापत्रे, स्मिता पवार, अनुप शर्मा, सुरेश बावनकर,भिम मांगडे,माया सांगवे, महेश बिराजदार,वहाब शेख, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Robbery News : दवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात 20 लाखांची घरफोडी

यावेळी किसन चावरीया म्हणाले, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी अतिशय चांगल काम करत आहे, दिल्लीमध्ये महिलांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत, शाळा, शिक्षण, पाणी, वीज, या व अशा विविध प्रश्नांवर मोठ्या प्रमाणावर दिल्लीत केजरीवाल सरकारने काम केले आहे.(AAP) दिल्लीमध्ये वाल्मिकी समाज आम आदमी पार्टीला मोठ्या प्रमाणावर जोडला गेलेला आहे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्येही वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात हा समाज आम आदमी पार्टीला जोडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यत्क केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.