Robbery News : देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात 20 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – कुटुंबातील सर्वजण देवदर्शनासाठी गेले असता चोरट्याने घरफोडी करून 40 तोळे दागिने आणि नऊ लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

शरद पंडित सोनवणे (वय 33, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी शुक्रवारी (दि. 11) सकाळी तुळजापूर, गाणगापूर,अक्कलकोट येथे गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. ते देवदर्शन वरून रविवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरातून 11 लाख 23 हजार रुपये किमतीचे 40.4 तोळे सोन्याचे दागिने आणि नऊ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 20 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.