Chikhali Crime : तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन (Chikhali Crime) करणाऱ्या वर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे.

याप्रकऱणी 20 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.28) फिर्याद दिली असून सनी लोखंडे (रा. रुपीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : नियमबाह्य गतीरोधक नागरिकांच्या जिवावर, धोकादायक स्पीड ब्रेकर काढण्यास सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे आरोपीने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तरीही आरोपी हो फिर्यादी जेंव्हा कामासाठी घरा बाहेर पडतील तेंव्हा तो त्यांचा पाठलाग करत असे. 27 फेब्रुवारी  रोजी ही आरोपी काही कारणास्तव आपल्या (Chikhali Crime) पत्नीसह भांडण्यासाठी फिर्यादीच्या घरी आला. यावेळी त्याने वाद करत असताना फिर्यादीशी गैरवर्तन केले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.