Pimpri News : नियमबाह्य गतीरोधक नागरिकांच्या जिवावर, धोकादायक स्पीड ब्रेकर काढण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमन करण्यासाठी शहरातील विविध भागातील रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर, रॅम्ब्लर स्ट्रीप, स्पीड टेबल असे वेगवेगळ्या प्रकारचे गतीरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, हे गतीरोधक आता वाहन चालकांच्या जिवावर उठले आहेत. (Pimpri News) शहरात हजारो गतीरोधक असताना पालिका प्रशासनाच्या दप्तरी फक्त 626 ब्रेकरची नोंद आहे. स्पीड ब्रेकरमुळे अपघात वाढत असून याबाबत एका सूज्ञ नागरिकाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने आता शहरातील धोकादायक ठरणारे आणि अनधिकृतपणे बनविलेले स्पीड ब्रेकर काढण्यास सुरूवात केली आहे.

Chinchwad Bye-Election :  उद्या मतमोजणी अन आजच भाजपच्या अश्विनी जगताप यांचे विजयाचे फेलक्स

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढीमुळे शहरातील झपाट्याने नागरिकरण होत आहे. वाहनांची संख्याही सातत्याने वाढत असताना रस्ते मात्र अरूंद होत आहेत. रस्त्यावर वाहने चालविताना अनेक वाहन चालक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात.(Pimpri News) यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. यासाठी शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर नागरिक, स्थानिक नगरसेवक स्पीड ब्रेकरची मागणी करतात. त्यानुसार महापालिका रस्त्यांची कामे करताना वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता स्पीड ब्रेकर बनविते.

 

नियम काय सांगतात?

स्पीड ब्रेकर बनविण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असते. तसेच स्पीड ब्रेकर इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमाप्रमाणे 4 इंच आणि 13 फूटाचा बनविणे आवश्‍यक आहे. मात्र, नियमाप्रमाणे स्पीड ब्रेकर बनविल्यास वेगवान वाहने त्यावर थांबूच शकत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन नियमाला फाटा देऊन जास्त उंचीचे स्पीड ब्रेकर उभारत असल्याचे अधिकारी स्वतः कबुली देत आहेत. मात्र, नियमबाह्य स्पीड ब्रेकरमुळे अनेक वाहन चालकांचे अपघात, काहींना मणक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे.

शहरातील अशाच नियमबाह्य स्पीड ब्रेकरविरोधात एका सूज्ञ नागरिकाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने आता शहरातील धोकादायक ठरणारे आणि अनधिकृतपणे बनविलेले स्पीड ब्रेकर काढण्यास सुरूवात केली आहे.(Pimpri News) त्यानुसार शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 626 स्पीड ब्रेकर आहेत. यामधील बेकायदेशीरपणे बनविलेल्या स्पीड ब्रेकरचा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व संबंधित परिसरातील वाहतूक शाखेचे पोलीस संयुक्त सर्व्हे करत आहेत. त्यानुसार नियमबाह्य स्पीड ब्रेकर काढून घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत 249 स्पीड ब्रेकर बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

 

फ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक तर ड मध्ये सर्वात कमी

शहरात हजारो गतीरोधक असताना पालिका दप्तरी फक्त 626 स्पीड ब्रेकरची नोंद आहे. यामध्ये फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वाधिक 171 तर ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रस्त्यांवर सर्वात कमी फक्त 4 स्पीड ब्रेकरची नोंद आहे. अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 63, ब 46, क 141, ड 4, इ 69, फ 171, ग 81 आणि ह 51 असे एकूण 626 रम्ब्लर स्ट्रीप, स्पीड टेबल शहरात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.