Chinchwad Bye-Election :  उद्या मतमोजणी अन आजच भाजपच्या अश्विनी जगताप यांचे विजयाचे फेलक्स

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा (Chinchwad Bye-Election) निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असताना आजच भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचे अभिनंदन करणारे फेलक्स लागले आहेत. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार (दि.2) सकाळी 8 वाजल्यापासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेता किमान 14 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Nigdi News : मॉडर्न मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. उद्या मतमोजणी होत होणार असताना (Chinchwad Bye-Election) पिंपरी- चिंचवड शहरात अश्विनी जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फलक झळकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.