Nigdi News : मॉडर्न मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – प्रो. ए. सो चे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (Nigdi News) मध्ये मंगळवारी (दि 28) राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी विज्ञान शिक्षक  राजीव कुटे, गंगाधर वाघमारे, प्रशांत कुलकर्णी व रामचंद्र घाडगे उपस्थित होते.

यावेळी निगडी प्राधिकरणातील प्रसिध्द विज्ञान प्रयोग मार्गदर्शक प्रा.  दिनेश काळेल सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र  यातील विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल व जिज्ञासा जागृत केली. यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन वायूंची निर्मिती व गुणधर्म तसेच  पाण्याची निर्मिती , विविध वस्तूतून ध्वनीनिर्मिती,  आधुनिक आवर्तसारणी  लक्षात ठेवण्याचे तंत्र, रॉकेट विज्ञान,  विविध रासायनिक अभिक्रिया प्रकार इत्यादी विषयी प्रयोगाद्वारे मार्गदर्शन केले.

SSC Exams : ऑल दे बेस्ट! दहावीच्या परीक्षेस उद्यापासून सुरूवात

प्रशालेचे प्राचार्य   प्रकाश पाबळे  यांनी प्रास्ताविक करून विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले. श्रुती डौले व गायत्री माने या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व व (Nigdi News)  सी. व्ही. रमण  यांचे जीवनचरित्र सांगितले. सूत्रसंचालन ओंकार गुंड व  आभार अदिती जाधव या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक, गंगाधर सोनवणे,  उमर शेख  ,सुनंदा खेडेकर व वृषाली सलगर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष  चिंतामणी घाटे,(Nigdi News) प्रमुख्याध्यापिका मृगजाताई कुलकर्णी  यांचे मार्गदर्शन लाभले  या उपक्रमाचे संस्था सचिव प्रा. शामकांत देशमुख व संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे यानी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.