SSC Exams : ऑल दे बेस्ट! दहावीच्या परीक्षेस उद्यापासून सुरूवात

एमपीसी न्यूज : दहावीच्या परीक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालंय..(SSC Exams) उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होईल.. यंदा ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे…  2 मार्च ते 25 मार्च या काळात ही परीक्षा होणार आहे.

Maharashtra Budget Session LIVE 2023 : संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल

परीक्षेआधी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना वर्गात सोडलं जाईल. त्यासाठी पोलिस पाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. (SSC Exam) तसंच पेपर सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षा‎ केंद्र परीसरातील झेरॉक्स बंद‎ ठेवण्याचे निर्देश आहेत.‎ पानपट्टी, टायपिंग आणि संगणक सेंटर तसंच इंटरनेट कॅफेही बंद ठेवण्यात येतील..

 

विद्यार्थ्यांनो ‘हे’ लक्षात ठेवा

आपले प्रवेशपत्र आणि त्याची फोटोकॉपी जवळ बाळगा.

परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचा.

प्रवेशपत्रावर परीक्षेसंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.