Maharashtra Budget Session LIVE 2023 : संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल

एमपीसी न्यूज : राज्यातील अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget Session 2023 LIVE) अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे त्याबद्दल संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. तर महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले.

 संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल

खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ’ असं वक्तव्य संजय राऊत यांना करणं महागात पडलं आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंग दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.

 

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू केलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.