Talegaon Dabhade : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चित्रकला व हस्तकला प्रदर्शन

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित,कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवारी (दि. २८) राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. (Talegaon Dabhade) यानिमित्त चित्रकला व हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले. इयत्ता नर्सरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात मांडले. हस्तकला व चित्रकला देखील आपल्या कुंचल्याद्वारे रेखाटून कॅनव्हासवरती उमटवल्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ चिराग खळदे व डॉ.संजय आरोटे हे लाभले होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे,संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. विज्ञान दिनानिमित्त शाळेतील सर्व विज्ञान व चित्रकला विषय शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. (Talegaon Dabhade) विद्यार्थी मनोगतात कु. हर्षल लोळगे व कु. अर्चना चौहान या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका  मीना अय्यर यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Pune News : मतमोजणीमुळे कोरोगाव पार्क येथील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस बदल

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे डॉ. चिराग खळदे यांनी आपल्या मनोगतात आपले अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून आपण आपली शैक्षणिक प्रगती कशी करू शकतो, हे सांगितले.

डॉ. संजय आरोटे यांनी देखील डॉ. सी.व्ही. रमण यांना आदरांजली वाहत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशाची वैज्ञानिक प्रगती कशी घडत गेली व त्यासाठी आपण सतत आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले इयत्ता नर्सरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे विज्ञान प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात मांडले होते व हस्तकला व चित्रकला देखील आपल्या कुंचल्याद्वारे रेखाटून कॅनव्हासवरती उमटवल्या होत्या. (Talegaon Dabhade) हे सर्व पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मोहिनी खोले, पाहुण्यांची ओळख मिस किरण आर्या यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.