Kiwale : जमावबंदी असताना देखील मरामारी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बजावली नोटीस

एमपीसी न्यूज – पोट निवडणूकीमुळे चिंचवड परिसरात जमावबंदी असताना देखील जमाव जमवून एकाला मारहाण करणाऱ्या सहा जणांना रावेत पोलिसांनी (Kiwale) सी.आर.पी.सी 41 अ प्रमाणे नोटीस बजावली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) किवळे येथे घडली आहे.

याप्रकरणी सुनिल रामचंद्र यादव (वय 46 रा. किवळे) यांनी फिर्याद दिली असून याप्रकऱणी रावेत पोलीस ठाण्यात रमाकांत भगवान मोदगुल (वय 38 रा.किवळे), साईनाथ शिवाजी विटकर (वय 31 रा.वाकड), ज्ञानदेव विलास क्षिरसागर (वय 32 रा.चिंचवड), गणेश ज्ञानेश्वर देवकर (वय 31 रा.वाकड),संकेत विठ्ठल शिंदे (वय 22 रा.वाकड) यांना नोटीस बजावली असून पियुष (पुर्ण नाव माहिती नाही) हा अद्याप फरार आहे.

Chikhali Crime : तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीच्या अंगावर धावून गेल्याचा जाब विचारला म्हणून रमाकांत व त्याच्या इतर साथीदारांनी गर्दी जमवून फिर्यादीला (Kiwale) प्लास्टीक पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोसायटीच्या गेट बाहेर कसे येता अशी दमदाटी केली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.