Wakad News : शस्त्र घेऊन रील करणे पडले महागात, रील नंतर थेट रवानगी तुरुंगात

एमपीसी न्यूज – प्रसिद्धीसाठी शिव्या किंवा अश्लिल भाषा वापरल्या बद्दल या आधीही पोलिसांनी रिल करणाऱ्यांवर केली होती. त्याप्रमाणे आता हातात कोयता घेऊन रिल करणे एका महाशयाला चांगलेच महागात पडले असून त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १३) दुपारी गुजरनगर थेरगाव येथे करण्यात आली.

शुभम अभिमान जाधव (वय 21, रा. गुजरनगर थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम जाधव यांने हातात कोयता घेऊन एक व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शस्त्र विरोधी पथकाने त्याला रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.