Wakad : शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केट मध्ये सुरुवातीला गुंतवणूक(Wakad) केलेली असताना पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगितल्याने त्यास गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने नकार दिला.

त्यानंतर अगोदर गुंतवलेली दोन कोटी 10 लाख रुपये रक्कम फ्रीज करत गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 29 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.

Mahalunge : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

विवेक सुभाष डांगे (वय 45, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी(Wakad) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7892423825, 7892423825, 8296649283, 7063089288, 9873427189 या क्रमांकावरून बोलणारी जुही (पूर्ण नाव माहिती नाही), 7800931175 या क्रमांकावरून बोलणारा चिन्मय (पूर्ण नाव माहिती नाही), कस्टमर केअर क्रमांक धारक 9873146680 आणि 7305890695 या क्रमांकाशी संबंधित बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी डांगे यांना Sequoia Capital या कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो असे आमिष दाखवले. व्हाटसअपवरून लिंक पाठवून डांगे यांना अकाउंट उघडण्यास भाग पाडले. आरोपींच्या सांगण्या प्रमाणे डांगे यांनी दोन कोटी 10 लाख 50 हजार रुपये गुंतवणूक केली.

त्यानंतर आरोपींनी डांगे यांच्या परस्पर केसीईआयएल या कंपनीचे शेअर अॅलॉट झाल्याचे सांगून आयपीओची रक्कम 4 कोटी 33 लाख 50 हजार रुपये भरण्याचा डांगे यांना आग्रह केला. मात्र डांगे यांनी ती ऑर्डर न दिल्याने ते पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी वेबसाईटवरील वॉलेटवर भरलेली दोन कोटी 10 लाख 50 हजार रुपये रक्कम फ्रीज करून ती काढता येत नसल्याचे दाखवत डागणे यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.